![]() |
श्रीमती सुनिता अशोक पाटील |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) गावच्या रहिवाशी श्रीमती सुनिता अशोक पाटील, वय ६८ यांचे आजारपणामुळे आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
श्रीराम विद्यालय कोवाड चे माजी मुख्याध्यापक कै. ए. डी. पाटील यांच्या त्या पत्नी तर यशवंत नागरी पतसंस्था कोवाड चे विद्यमान चेअरमन, कालकुंद्री येथील कलमेश्वर विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक, शेतकरी सहकारी संघ कोल्हापूरचे संचालक व माजी आमदार राजेश पाटील यांचे खंदे समर्थक विनोद अशोक पाटील यांच्या त्या मातोश्री होत.
मातोश्री सुनिता यांच्यावर कालकुंद्री येथील स्मशानभूमीत आज दुपारी २.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment