'शक्तीपीठ' विरोधात मुसळधार पावसातही आजरा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा विराट मोर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2025

'शक्तीपीठ' विरोधात मुसळधार पावसातही आजरा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा विराट मोर्चा

 

 मोर्चात मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील. सोबत राजू शेट्टी, विजय देवणे, संपत देसाई, मुकुंदराव देसाई, सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, विद्याधर गुरबे, अंजना रेडेकर आदी.

आजरा : सी एल वृत्तसेवा 

       राज्यातील शेतकऱ्यांना उध्वस्त व भिकारी करणारा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे. या मागणीसाठी आजरा येथे मुसळधार पावसात विराट मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसोबत सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.

       आजरा येथील शिवतीर्थ पासून तहसील कार्यालयावर शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीने मुसळधार पावसात आजरा, चंदगड, गडहिंग्लज व भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने काढण्यात आलेल्या विराट मोर्चात एकच जीद्द शक्ती पीठ रद्द,शक्ती पीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, बाजी लाऊ प्राणाची या घोषणा देत  माजी खा. राजू शेट्टी, कॉ.संपत देसाई, विजय देवणे, सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, मुकुंदराव देसाई, विद्याधर गुरबे, अंजना रेडेकर, रियाज शमनजी, गोपाळराव पाटील, कॉ. अतूल दिघे, सम्राट मोरे, काँ. संजय तर्डेकर, तानाजी देसाई, दशरथ घुरे, शिवाजी गुरव, राजेंद्र गड्डयान्नावर, संभाजी शिरोलीकर, राहूल देसाई, अमर चव्हाण. मुकुंदराव देसाई, सत्यजीत जाधव, उमेश आपटे, संभाजी पाटील, शामराव देसाई, राजू होलम, सचिन घोरपडे, दिग्विजय कुराडे, प्रभाकर खांडेकर, अनिल फडके, अभिषेक शिंपी, संजय सावंत, प्रभाकर कोरवी, युवराज पोवार, रविंद्र भाटले, नौशाद बुढेखान आधी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

      यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले ज्यांच्या जमिनी जाणार नाहीत त्या शेतकऱ्यांचीही या महामार्गामुळे मोठी हानी होणार आहे. पाणी शेतात तुंबणार आहे. गावांची फाळणी होणार आहे. नदीकाठची व रस्त्या जवळची गावे अस्तित्वहीन होणार आहेत.  हा रस्ता भाविकांसाठी नसून लोकांच्या घामाचा पैसा वेगळ्या माध्यमातून  वाटून घेण्यासाठी चाललेला खटाटोप आहे. गोव्यातून खनिज नेण्यासाठीच या रस्त्याचा खरा वापर होणार आहे. 

       यावेळी बोलताना माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले शक्तिपीठ हा महामार्ग शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा असल्याची खात्री शेतकऱ्यांना पटली असल्याने शेतकरी स्वतःहून या विरोधात रस्त्यावर उतरत आहेत. हा लढा येत्या काळात अधिक तीव्र करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी सतेज पाटील यांनी केले. 

     यावेळी बोलताना कॉम्रेड संपत देसाई म्हणाले, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी शेतकऱ्यांना उद्धस्त करण्याची भूमिका घेतली आहे. शक्ती पीठ कुणासाठी करत आहात याचे भान आमदार शिवाजी पाटील यांनी ठेवावे. चंदगडचा विकास आधीच झाला आहे. आमदार पाटील यांनी आम्हाला विकास शिकवू नये असा टोला संपत देसाई यांनी हाणला. १२ जिल्ह्यांतून या रस्त्याला विरोध आहे हे लक्षात घ्यावे. 

       या महामोर्चा मध्ये शेकडो महिला मुसळधार पावसात डोक्एयावर रली घेऊन सामील झाल्या होत्या.

No comments:

Post a Comment