चंदगड : सी एल वृत्तसेवा
ढोलगरवाडी ता. चंदगड शेतकरी शिक्षण मंडळ संचलित मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक सट्टूपा वाघमारे जुनिअर कॉलेज प्रशालेत ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ढोलगरवाडी गावातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती सरस्वती दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात झाले. प्राचार्य एन. जी. यळ्ळूरकर यांनी स्वागत केले. यावेळी यावर्षी झालेल्या दहावी परीक्षेत गुणानुक्रमे नंबर पटकावलेल्या कु. श्रावणी सदाशिव पाटील, कु.अक्षरा बाबुराव कदम व कु. प्रांजल बाबुराव पाटील यांना शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. वैजू नागो कलखांबकर यांच्या आईंच्या स्मरणात बक्षीसे देऊन गौरवण्यात आले.
यावेळी गावचे सरपंच सुस्मिता संजय पाटील, सर्व सदस्य, सेवा सोसायटी चेअरमन गावडू हनमंत पाटील, व्हा. चेअरमन प्रकाश भोगुलकर, पोलीस पाटील राजेंद्र पाटील, माजी शि. वि. अधिकारी विलास कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष तानाजी टक्केकर, उपाध्यक्ष के. टी. पाटील, संचालिका श्रीमती शांता बाबुराव टक्केकर, आजीमाजी सैनिक, शाळेचे आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment