कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कुदनुर (ता. चंदगड) येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेवर गुरुवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात आले. हे ध्वजारोहण ज्ञानेश्वर माऊली (ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी, जन्म गुरुवार दि. २२ ऑगस्ट १२७५) यांच्या साडेसातशे व्या जयंतीचे औचित्य साधून गावातील वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. हा मान गावातील ह. भ. प. निंगाप्पा भरमू ओऊळकर व सौ लक्ष्मी निंगाप्पा ओऊळकर दांपत्याला देण्यात आला.
ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत सोनार यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे फोटो पूजन जोतिबा कृष्णा गुंडकल व सिद्राम आंबेवाडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महसूल विभागाचा जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार मिळाल्याबद्दल गाव कामगार पोलीस पाटील नामदेव अर्जुन लोहार यांचा सत्कार लोकनियुक्त सरपंच प्रा. सौ. संगीता सुरेश घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तंटामुक्त कमिटी अध्यक्ष सुरेश पवार, उपसरपंच अशोक वडर, ग्रामपंचायत व तंटामुक्त कमिटीचे सर्व सदस्य, वारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment