मुंबईच्या आदर्श मंडळांने केला अर्जुनवाडीतील ६० कष्टकरी ज्येष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

31 August 2025

मुंबईच्या आदर्श मंडळांने केला अर्जुनवाडीतील ६० कष्टकरी ज्येष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान

 

जेष्ठ शेतकऱ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करताना गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व मान्यवर

नेसरी : सी एल वृत्तसेवा

     गणेश उत्सवाचे औचित्य साधून अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथे ६० वर्षावरील तब्बल ६० कष्टकरी शेतकऱ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन केले. आदर्श मंडळ मुंबईने गावातील बळीराजांचा केलेला हा सन्मान एक स्तुत्य उपक्रम ठरला. अष्टविनायक गणेश मंडळाच्या सहकार्याने अर्जुनवाडी येथे हा सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी विठ्ठल पाटील होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र हिडदूगी, आप्पासाहेब कुंभार, रवींद्र मंडलिक, प्रकाश देसाई, शिवाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

   स्वागत मंडळाचे अध्यक्ष किरण पाटील यांनी केले. विठ्ठल पाटील यांनी प्रस्ताविकात सन्मान सोहळ्याचा हेतू सांगितला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान चिन्ह, टी शर्ट व गांधी टोपी देऊन सत्कार केला.  

रवींद्र हिडदुगी यांनी या अनोख्या कार्यक्रमाचे कौतुक करून शेतकऱ्यांप्रती सद्भावना व्यक्त केली. शेतकऱ्यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी सचिव अशोक पाटील, शिवाजी पाटील, अमृत प्रधान, प्रमोद पाटील, अमृत प्रधान, आकाश पाटील, आकाश सतबाळे, संदीप पाटील, सुधाकर पाटील, ऋषीकेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कृष्णा पाटील यांनी तर आभार डॉ. बबन गोळसे यांनी मानले. या सत्काराचे नियोजन विठ्ठल पाटील, शंकर जाधव, आप्पा नाईक, पांडुरंग धडाम, संभाजी नाईक व रवींद्र पाटील यांनी केले.

 जेष्ठ शेतकऱ्यांना भेटवस्तू देऊन सन्मान करताना गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व मान्यवर

No comments:

Post a Comment