![]() |
मुंबई येथील मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी बेळगाव मधून निघालेले मराठा वाघ.. |
बेळगाव : सी एल वृत्तसेवा
मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण मोर्चा आंदोलनास पाठिंबा देऊन प्रत्यक्ष मोर्चात सहभागी होण्यासाठी बेळगाव येथील सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा चे शेकडो मावळे मुंबई कडे रवाना झाले. दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी हे सर्व मावळे मुंबईकडे रवाना झाले असून १ ऑगस्ट सप्टेंबर रोजी सकाळी ते जरांगे पाटील यांच्या मोर्चा स्थळी पोहोचून आंदोलनात सहभागी होतील. मराठा हृदय सम्राट जरांगे यांच्या आंदोलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणिक अभूतपूर्व प्रतिसाद लाभत असून २९ ऑगस्ट रोजी त्यांच्यासोबत गेलेल्या मराठा बांधवांव्यतिरिक्त गेल्या दोन दिवसांत हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. आता कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यातील मराठा बांधव सुद्धा आपली कुमक घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. बेळगाव येथून रवाना झालेल्या या शिष्टमंडळात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, माजी नगरसेवक राजू बिर्जे, मोतेश बारदेशकर, अनंत पाटील, कृष्णा पन्हाळकर, अजय लखाटे- पाटील, शिवम पन्हाळकर, राजेंद्र बैलूर, विनायक बिर्जे, ओमकार पन्हाळकर, गणेश शिंदोळकर आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मुंबईकडे रवाना होणाऱ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अंकुश केसरकर, चंद्रकांत कोंडुसकर, प्राचार्य आनंद आपटेकर, राजकुमार मोरे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment