कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) गावचे सुपुत्र व सध्या नेसरी, सुंदरनगर येथील रहिवासी विठ्ठल भावकू भोगण (वय 53) यांचे रविवारी (दि. 31) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. कोवाड येथील स्टॅम्प रायटर रामा भोगण
यांचे ते बंधू होत. कोल्हापूर येथील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र याला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी सकाळी नेसरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन गुरुवारी (दि. 4) नेसरी येथे होणार आहे. वाडी रत्नागिरी आणि नावली (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.
त्यांनी यापूर्वी चंदगड तालुक्यात राजगोळी खुर्द, कालकुंद्री, कुदनुर कानडी येथे तर आजरा तालुक्यात मासेवाडी, जाधववाडी, खोराटवाडी येथे ग्रामसेवक म्हणून काम केले आहे. त्यांचे प्रमोशन झाल्यानंतर वाडी रत्नागिरी येथे बदली झाली होती.
No comments:
Post a Comment