कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील कोवाड मर्चंट ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोवाड या संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त बुधवार दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेने गेल्या २५ वर्षात कोवाड व परिसरातील व्यापारी, नोकरवर्ग, शेतकरी, विद्यार्थी यांना व्यवसाय वृद्धीसाठी व शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ उभे करून त्यांच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलत विश्वास व जिव्हाळा संपादन केला आहे. सभासदांच्या विश्वासावर संस्थेची उत्तरोत्तर प्रगती सुरू असून लवकरच संस्थेच्या आणखी शाखा तालुक्यात सुरू करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत घेण्यात आला आहे. ऑडिट वर्ग 'अ', सोनेतारण कर्ज, वीज बिल भरणा केंद्र, स्वमालकीची प्रशस्त व भव्य इमारत, सोने खरेदीसाठी कमी व्याजदराने कर्ज, नियमित कर्जावर सरळ व्याजदर आकारणी, तत्पर व विनम्र सेवा ही संस्थेची वैशिष्ट्ये आहेत. सध्या संस्थेची सभासद संख्या ९८८, भाग भांडवल रुपये ५६,६६,६१०, संस्थेचा स्वनिधी १,३०,१६,४२२, विविध प्रकारच्या ठेवी ७,२३,८१,०४९, गुंतवणूक ३,८६,३६,०३८ असून संस्थेने ५,३०,२३,०४७ रुपये इतके कर्जवाटप केले आहे. सभासदांना यावर्षी १५ टक्के प्रमाणे डिव्हिडंड वाटप सुरू आहे.
संस्थेला प्रगतीपथावर ठेवण्यात विद्यमान चेअरमन दयानंद मोटुरे, व्हाईस चेअरमन उत्तम मुळीक, संचालक महंमदशाकीर काजी, राणबा उर्फ बंडू तोगले, कल्लाप्पा रामजी वांद्रे, सौ गीतांजली कांतीलाल अंगडी, संतू मारुती उर्फ बाळू वांद्रे, वीरुपाक्ष गणाचारी, रवी मारुती पाटील, सौ मनीषा गोविंद पाटील, बी. के. पाटील, विष्णू तानाजी गावडे, कृष्णा यल्लाप्पा कांबळे व मॅनेजर पुंडलिक पाटील यांचे योग्य नियोजन व पारदर्शी कारभार तसेच कर्मचारी वर्गाची मेहनत यांचा मोलाचा वाटा आहे.
संस्थेच्या रौप्य महोत्सव निमित्त दि. ३ रोजी सकाळी ११ वाजता श्री मंगल कार्यालय नेसरी रोड कोवाड येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. महेश कदम (विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर) हे भूषवणार असून प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर आनंद मेनसे (माजी प्राचार्य जीएसएस कॉलेज बेळगाव) हे आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निळकंठ करे (जिल्हा उपनिबंधक), सुजय येजरे (सहाय्यक निबंध चंदगड), विजय प्रधान (जीएसटी उपायुक्त), अरुण काकडे (माजी विभागीय सहनिबंधक), महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर व सुरेश पवार (प्रमाणित लेखा परीक्षक) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे मॅनेजर पी.पी. पाटील या महिन्यात सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा सपत्नीक सेवापूर्ती गौरव मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त सर्व सभासदांना भेटवस्तू वस्तूंचे वाटपही यावेळी करण्यात येणार आहे. दुपारी २ ते ४ वाजता स्नेहभोजन तर सायंकाळी ७.३० वाजता सप्तसुरांच्या वेलीवर हा श्री साई माऊली प्रस्तुत व राम कुंभार निर्मित भावगीते, भक्तीगीते, व जुन्या नव्या मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व कार्यक्रमांचा लाभ सभासद व हितचिंतकांनी घ्यावा असे आवाहन संचालक मंडळांने केले आहे.
No comments:
Post a Comment