ऋतुजा विलास नार्वेकर सेट परीक्षा उत्तीर्ण - चंदगड लाईव्ह न्युज

01 September 2025

ऋतुजा विलास नार्वेकर सेट परीक्षा उत्तीर्ण

 

ऋतुजा विलास नार्वेकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

    इब्राहिमपूर (ता. चंदगड) येथील ऋतुजा विलास नार्वेकर हि रसायनशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १५ जून २०२५ रोजी घेतलेल्या सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये तीने हे यश प्राप्त केले आहे. रसायनशास्त्र या विषयात झालेल्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी महाराष्ट्र सेटसाठी पात्र ठरली. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र चंदगड नगरीत अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment