मुंबई येथे वृक्षारोपण साठी बेलपत्र रोपे श्रीकांत पाटील व सौ शोभा पाटील यांच्याकडे सुपूर्द करताना सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ
चंदगड : सी एल वृत्तसेवा
कर्नाटक सह महाराष्ट्र व गोवा राज्यात सामाजिक व धार्मिक कार्यात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या सर्व लोकसेवा फाउंडेशनने श्रावण महिन्यात पवित्र अशा बेलपत्र रोपांचे वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प हाती घेतला होता. या अनुषंगाने संस्थेचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासून ते शेवटच्या सोमवार पर्यंत तब्बल १००८ बिल्वपत्र रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.तळोजा- नवीमुंबई येथे वृक्षारोपण करताना सिद्धिविनायक बिल्डर्सचे अधिकारी व पदाधिकारी
या उपक्रमांतर्गत श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी दैनिक पुढारीचे पत्रकार, चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व डिजिटल मीडिया परिषदेचे कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी सदस्य माजी मुख्याध्यापक श्रीकांत पाटील कालकुंद्री यांच्या माध्यमातून नवी मुंबई येथे बेल वृक्षांचे रोपण करण्यात आले. नवी मुंबई परिसरातील खारघर, तळोजा येथील सिग्नेचर सिटीतील वृक्षारोपण प्रसंगी विशाल श्रीकांत पाटील, सिद्धिविनायक बिल्डर्स चे संचालक अगरवाल, मॅनेजर निखिल, अलंकार पाटील, राजू कामत यांची उपस्थिती होती.
विरेश हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली सर्व लोकसेवा फाउंडेशनने आतापर्यंत लाखो वृक्ष रोपण व संगोपन केले आहे. रुग्णांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिका, देव देवतांचे भग्न फोटो, प्रतिमा, मूर्ती जे मंदिरांच्या परिसरात किंवा कचरा कोंढाळ्यात नागरिकांच्या मार्फत फेकून दिलेले असतात त्यांचे संकलन करून धार्मिक पद्धतीने विधिवत दहन किंवा विसर्जन करणे, विविध अपघातात मृत पावलेल्या मुक्या प्राण्यांचे दफन करणे. अशी समाजाभिमुख आदर्श कामे सर्व लोकसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गेली काही वर्षे सुरू आहेत. या कामी वीरेश हिरेमठ यांना निळकंठय्या हिरेमठ, नागेश शिंदे, बाळू कणबरकर, निंगय्या बोरलकट्टी, सुभाष पाटील, देवाप्पा कांबळे, गौरीश हिरेमठ, मकरंद लोखंडे, वसंत कांबळे या सहकाऱ्यांचे मोठे योगदान लाभत आहे.
सर्व लोकसेवा फाउंडेशनचे लोकाभिमुख सामाजिक कार्य पाहून बसवन कुडची येथील निळकंठय्या राचय्या हिरेमठ- शास्त्री यांनी फाउंडेशनला रुग्णवाहिका भेट देऊन फाउंडेशन चा एक प्रकारे सन्मानच केला आहे. यामुळे सर्व लोकसेवा फाउंडेशनचा जनमानसावरील ठसा व विश्वास अधिकच वृद्धिंगत झाला आहे. परिणामी संस्थेच्या लोकसेवेच्या कार्याची व्याप्ती आणखी वाढली आहे.
No comments:
Post a Comment