कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
मराठी विद्यामंदिर म्हाळेवाडी (ता. चंदगड) शाळेत' माझा खाऊ कट्टा' सहशालेय उपक्रमांतर्गत खाऊ बाजार भरविण्यात आला. यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी खाऊचे स्टाॅल भरविले. विद्यार्थ्यानी आज दुकानदाराची भूमिका निभावली. याला ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत खाऊचा आनंद लुटला. या उपक्रमामूळे विद्यार्थ्याना आर्थिक व्यवहार ही संकल्पना प्रत्यक्षात अनुभवता आली.
आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सी. ए. पाटील व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक निलेशकुमार सायनेकर, दयानंद पवार, आपय्या पिटूक, सचिन पावरा आदी शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन अध्यापक दयानंद पवार यांनी केले.

No comments:
Post a Comment