कालकुंद्री परिसरात गौरी गणपती विसर्जन उत्साहात, कर्यात भागात निर्माल्य गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतींचे नियोजन - चंदगड लाईव्ह न्युज

02 September 2025

कालकुंद्री परिसरात गौरी गणपती विसर्जन उत्साहात, कर्यात भागात निर्माल्य गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतींचे नियोजन

कालकुंद्री येथे ट्रॅक्टर मधून गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी उपस्थित भाविक

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

     चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागात गौरी गणपती विसर्जन उत्साहात पार पडले. भागातील बहुतांशी सर्वच गावे ही ताम्रपर्णी नदी काठावर वसलेली असल्याने बहुतांशी गणेश विसर्जन हे ताम्रपणी नदीपात्रात करण्यात आले. नदी काठावरील प्रत्येक ग्रामपंचायतीने निर्माल्य कचरा थेट नदीत जाणार नाही याची दक्षता घेत नदीकाठी निर्माल्या रथ तयार ठेवले होते. त्यामुळे भाविकांनी निर्माल्य या ट्रॉल्यामध्ये टाकल्याने नदी प्रदूषण कमी होण्यास मदत झाली. 

   कालकुंद्री येथे दुपारी एक वाजल्यापासून घरगुती गणपतीचे विसर्जन सुरू झाले. ते रात्री उशिरापर्यंत सुरू होते. गणेश विसर्जना त प्रसंगी कुटुंबातील अनेक सदस्य सहभागी झाले होते. गावातील काही गल्लीतील गणपतींचे एकत्रितपणे मिरवणुकीने विसर्जन करण्यात आले. यावेळी लाऊड स्पीकर वर बाप्पांची गाणी, फटाक्यांची आतषबाजी व गणपतीचा जयजयकार करताना बाल समूह तरुण मंडळी दिसून आली. 

  कालकुंद्री येथे ताम्रपर्णी नदीकाठावर ग्रामपंचायत मार्फत निर्माल्य कचरा गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली, निर्माल्य रथ ठेवण्यात आला होता. येथे उपसरपंच संभाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य विलास शेठजी, प्रशांत मुतकेकर यांच्यासह कर्मचारी सागर पाटील, नरसु कांबळे हे भाविकांना सूचना देण्याबरोबरच निर्माल्य कचरा गोळा करण्यासाठी मदत करत होते.

No comments:

Post a Comment