कानडी बंधाऱ्यावर घरगुती गणपतीचे विसर्जन, बांधिव घाट नाही, मुसळधार पाऊस व चिखलामुळे गणेश भक्तांची नाराजी - चंदगड लाईव्ह न्युज

02 September 2025

कानडी बंधाऱ्यावर घरगुती गणपतीचे विसर्जन, बांधिव घाट नाही, मुसळधार पाऊस व चिखलामुळे गणेश भक्तांची नाराजी

कानडी बंधाऱ्यावरून नदीत गणपती विसर्जन करताना सुरू असलेली गणेश भक्तांची कसरत

नागनवाडी : सी एल वृत्तसेवा 

     घटप्रभा नदीवरील कानडे बंधाऱ्यावर परिसरातील गणेशभक्त आणि गौरी गणपती विसर्दीजन केले. नदीवर बांधिव घाट नाही. त्यातच पावसाची संततधार आदी समस्यांना गणेश भक्तांना तोंड द्यावे लागले. बाप्पाच्या विसर्जनात अडथळा निर्माण झाला. गेली चार वर्ष सतत पाठपुरावा करून ही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

    घटप्रभा कानडी बंधाऱ्यावर कानडी, इनाम सावर्डे, पोवाचीवाडी, सातवणे,  गंधर्वगड,  वाळकुळी, केरवडे या भागातील घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी नदी वरती आणले जातात. हजारो मुर्त्या विसर्जनासठी आणल्या जातात परंतु यंदा सतत चार महिने पावसाची संततधार चालू असल्यामुळे नदीवर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.  घाट नसल्यामुळे बाप्पाचे विसर्जन करताना दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. यासाठी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून आज बाप्पाचे विसर्जन करावे लागले. यंदा नदीच्या पाणी पातळीत ही खूप वाढली होती. त्यामुळे घाट असणे हे अत्यंत गरजेचं होतं तो घाट लोकप्रतिनिधींनी तात्काळ बांधून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व गणेशभक्त करत आहेत.

No comments:

Post a Comment