![]() |
धुमडेवाडी येथे सर्पमित्र संदीप टक्के कर यांनी पकडलेला नाग साप. |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
धुमडेवाडी (ता. चंदगड) येथे आज दि. ३/९/२०२५ रोजी दुपारी प्रा. एन. आर. पाटील यांच्या घरा शेजारी साप असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी ढोलगरवाडी येथील सर्पमित्र संदीप बाबुराव टक्केकर यांना फोनवरून ही माहिती सांगितली. सर्पमित्र संदीप यांनी तात्काळ धुमडेवाडी येथे जाऊन लपलेल्या सापाला बाहेर काढले. यावेळी तो अति विषारी नाग साप असल्याचे दिसून आले. चपळ व देखण्या नागाला पाहून नागरिकांची भंबेरी उडाली. संदीप टक्केकर यांनी पकडलेला नाग जमलेल्या ग्रामस्थांना दाखवून त्याच्या बद्दल माहिती दिली. नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू केला.
No comments:
Post a Comment