चंदगड : सी एल वृत्तसेवा
२ सप्टेंबर २०२५: चंदगड आगारात गणेश विसर्जन सोहळा भावपूर्ण वातावरणात व उत्साहात पार पडला. आगारात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. विसर्जन मिरवणुकीत आगारातील अधिकारी चालक वाहक कार्यशाळा कर्मचारी यांच्यासह महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग होता.
यावर्षी महिलांच्या हस्ते गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात आली, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. आगार परिसरात भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात कर्मचाऱ्यांनी एकजुटीने सहभाग घेतला. महिला कर्मचाऱ्यांनी उत्साहाने भाग घेतला आणि मूर्ती विसर्जन मिरवणूक प्रसंगी सर्वांनी "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा घोषणा देत बाप्पांना निरोप दिला. या कार्यक्रमाने आगारातील कर्मचाऱ्यांमधील सौहार्द आणि एकतेचे दर्शन घडवले.
No comments:
Post a Comment