डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन १४ रोजी, मंत्री शिरसाट, सावे, पत्रकार पोखरकर यांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2025

डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन १४ रोजी, मंत्री शिरसाट, सावे, पत्रकार पोखरकर यांची उपस्थिती

  


संपत पाटील, चंदगड : सी एल वृत्तसेवा 

     अखील भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न 'महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया परिषद' चे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवार दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे होणार आहे. अधिवेशनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी रवाना झाले.

      एकनाथ रंग मंदिर, क्रांती चौक औरंगाबाद येथे होणाऱ्या या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान मराठी पत्रकारांची मातृसंस्था मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख भूषवणार आहेत. परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ना. अतुल सावे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र हे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मिलिंद आष्टीवकर (अध्यक्ष अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद), प्रमुख वक्ते जेष्ठ संपादक माध्यम तज्ञ तुळशीदास भोईटे, अभिव्यक्ती न्युज चॅनेल चे संपादक रवींद्र पोखरकर यांच्यासह परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष अनिल वाघमारे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, गो. पी. लांडगे, हेमंत वनजू, प्रकाश कांबळे यांच्यासह सचिन शिवशेट्टे (लातूर विभाग), रवी उबाळे (संभाजीनगर विभाग), शोभा जयपुरकर (महिला आघाडी प्रमुख) संयोजन समितीचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, सचिव प्रकाश भगनुरे, उपाध्यक्ष महादेव जामनिक, मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे, कार्याध्यक्ष कानिफ अन्नपूर्णे, कोषाध्यक्ष ब्रह्मानंद चक्करवार  आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

      या अधिवेशनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून वीस पदाधिकारी रवाना झाले असून चंदगड तालुक्यातून डिजिटल मीडिया परिषद जिल्हा कार्यकारणी सदस्य व चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य अनिल धुपदाळे, चंदगड पत्रकार संघाचे सदस्य सचिन तांदळे आदी रवाना झाले आहेत.

No comments:

Post a Comment