चंदगड: सी एल वृत्तसेवा
बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदोन्नती नंतर मुक्त करणार असल्याची ग्वाही कार्तिकेयन एस (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर) यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा कोल्हापूर च्या शिष्टमंडळाने गुरुवार दि. ११/९/२०२५ रोजी प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नासंदर्भात मु. का. अ. व शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. त्यावेळी बदली संदर्भात झालेल्या चुकांची करावी. या प्रश्नावर दुरुस्तीसाठी आलेल्या अर्जाची माहिती गोळा करणेचे काम सुरु आहे. ज्यांची चुकीची बदली झाली आहे त्यात दुरुस्ती करणे. बदली झालेल्या शिक्षकांना इतर जिल्ह्यांनी मुक्त केले. आपणही त्वरीत कार्यवाही करावी. या मागणीवर केंद्रप्रमुख पदोन्नती नंतर तात्काळ अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले.
केंद्रप्रमुख / व वि. अ. पदोन्नती लवकरात लवकर घेणेत यावी. या मागणीवर १९ सप्टेंबरला केंद्रप्रमुख पदोन्नती घेणेत येईल. असे सांगितले. मुख्याध्यापक व पदवीधर पदोन्नती घेणेत यावी. या प्रश्नावर TET ची अट असलेने या पदोन्नत्या घेता येणार नाहीत. असे सांगितले. विषय शिक्षक रिव्हर्शन लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. या मागणीवर सप्टेंबर महिनाखेर पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना सोयीची पदस्थापना देणेत यावी. शुन्य शिक्षकी शाळांबाबत मंत्रालयातून मार्गदर्शन मागितले आहे. त्यानंतर विचार होईल. निवडश्रेणी यादी जाहीर करण्यात यावी. सद्या प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागात आहे. पुढील आठवड्यांत निश्चीत मार्गी लागेल. आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम महिनाखेर पर्यंत घेणेत यावा. मा. पालक मंत्री यांचेकडे तारीख व वेळ मागितली आहे. ती मिळताच लगेच कार्यक्रम घेणेत येईल. अशा प्रकारे शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या प्रश्नांचे अधिकाऱ्यांनी समाधानकारक निरसन केले.
शिष्टमंडळात राजाराम वरुटे, जिल्हा अध्यक्ष बबन केकरे, सरचिटणीस डी.पी. पाटील, राज्य संपर्क प्रमुख राजमोहन पाटील, राज्य उपाध्यक्ष सतीश माळवदकर, जिल्हा महिला अध्यक्षा श्वेता खांडेकर, बँक माजी चेअरमन बाजीराव कांबळे, प्रशांत पोतदार, साहेब शेख, दिलीप पाटील, तालुका अध्यक्ष साताप्पा चौगले, अनिल चव्हाण,श्रीपती तेली, पतसंस्था चेअरमन प्रताप राबाडे,दत्तात्रय एकशिंगे, जिल्हा महिला कोषाध्यक्षा नसीम मुल्ला, सौ. जोत्स्ना महात्मे, तानाजी पोवार, मारुती दिडे, मदन एडगे, बाबासाहेब पाटील,बबलू वडर, संजय ठाणेकर आदि संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment