मोटणवाडी जवळील कारवाईत चंदगड पोलिसांच्या हाती तब्बल १३ लाख ५४ हजार रुपयांचे गोवा बनावटीचे घबाड - चंदगड लाईव्ह न्युज

03 September 2025

मोटणवाडी जवळील कारवाईत चंदगड पोलिसांच्या हाती तब्बल १३ लाख ५४ हजार रुपयांचे गोवा बनावटीचे घबाड

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   काल दिनांक 2 सप्टेंबर रोजी चंदगड पोलिसांनी पणजी, दोडामार्ग, चंदगड मार्गावरील मोटणवाडी (ता. चंदगड) गावानजीक सापळा लावून गोवा बनावटीची बेकायदा दारू वाहतूक करणारा टेम्पो पकडला. यात पोलिसांना 13 लाख 54 हजार 880 रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या सील बंद दारूच्या बाटल्या आढळून आल्या. टेम्पो सह 22 लाख 54 हजार 880 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अजय मारुती वाडेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस ठाणे चंदगड यांच्या फिर्यादीवरून घटनेतील आरोपी 1] प्रितेश उल्हास पागम वय 33 वर्षे रा. घर नंबर 738 शिवलकर वाडा, मुळगाव पोस्ट आसनोरा, बिचोलीम, नॉर्थ गोवा (सध्या रा. कोनाकट्टा ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग) 2] शिवाजी गावडे रा. पार्ले ता चंदगड 3] उमेश आवडण रा. तुडीये ता. चंदगड, जि. कोल्हापूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गु.र.नं.-256/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 125, 324 [2] सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 [अ] [ई], 90, 108, 83 सह मोटर वाहन कायदा कलम 239/177, 184 प्रमाणे कारवाई सुरू केली आहे.

 या कारवाईत मिळालेला मुद्देमाल पुढील प्रमाणे 1) 1,72,800/- रु-Black Delux whisky 2) 1,98,000 /- रु-Black Delux whisky. 3) 96,000 /- रु. REALS VODKA. 4) 40,320/- रु-Macdonald No 1 whisky. 5) 13,200/- रु-Macdonald No 1 whisky. 6) 2,88,000 /- रु Golden Ace Bluie Fine Whisky 7) 108000/- रु-Golden & Black XXX Rum. 8) 79200/-रु-Old Monk XXX Rum. 9) 24,000 /- रु-Reals Choice APPLE VADKA. 10) 24,000 /- रु Reals Choice ORANGE VADKA. 11) 48,000 /- रु Haywards Fine Whisky. 12) 26,400 /- रु KING EDGAR Pure Grain Whisky. 13) 16,800 /- रु MYSTIQUE PREMIUM GRAIN WHISKY. 14) 2,12,160 /- रु-Reseve 7 RARE Whisky. 15) 8,000 /- रु-Kingfisher Strong Premium Beer. 16) 9,00,000/- रु-टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची पिकअप. असा एकुण :- 22,54,880 /- रुपये किंमतीचा गुन्ह्याचा माल जप्त केला.

महाराष्ट्र राज्याचा कर चुकविण्याच्या हेतुने वाहतुक करीत असताना मोटनवाडी या ठिकाणी पोलीसांनी हाताने थांबण्याबाबत इशारा केला असतानाही वाहन पोलीसांना पाहुन भरधाव वेगात चालवुन इतराचे जिवीत व व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात अशा रीतीने चालवून पोलिसांच्या वाहनाला ठोकून पुढे जात असताना पोलिसांनी पाठलाग करून वाहनासह संशयीत आरोपींना पकडले.

गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार गेंगजे करत आहेत.

No comments:

Post a Comment