अडकूर आठवडा बाजारात वाहतूकीला अडथळा करणाऱ्या व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

03 September 2025

अडकूर आठवडा बाजारात वाहतूकीला अडथळा करणाऱ्या व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

    अडकूर (ता. चंदगड) येथे बुधवारीआठवडी बाजारात रस्त्यावर पुढे दुकान मांडून वाहतूकीला अडथळा करणाऱ्या  व्यापाऱ्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने दंडात्मक कारवाई  करण्यात आली.

     तसेच पुढच्या बुधवारपासून रस्त्यावर  बसणाऱ्यां  व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे . त्यामुळे व्यापाऱ्यांनी दिलेल्या जागेतच आपले दुकान थाटावे. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सरपंच सचिन गुरव , सदस्य अभिजित देसाई यानी सांगीतले. यावेळी अडकुरचे सरपंच सचिन गुरव, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत देसाई, ग्रामसेवक शिवराज देसाई, क्लार्क शिरीन शेख, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment