नेसरी / सी एल वृत्तसेवा
गणरायाच्या आगमनानंतर गेले ६ दिवस घरोघरी गणरायाचे विविध प्रकारचे कार्यक्रम झाले. सर्वजन आनंदाने गणरायाच्या पूजनामध्ये मग्न असतानाच निरोपाचा क्षण जवळ आला . काल अर्जुनवाडी (गडहिंग्लज ) येथे दुपारी ३वाजल्यापासून घरगुती गौरी गणपती चे विसर्जन सुरु झाले. विसर्जन प्रसंगी प्रत्येक कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते .तसेच आदर्श मराठा बाईज, कला क्रीडा मंडळ, अर्जुनवाडी च्या सदस्यांनी बापांची गाणी, फाटक्याची आताशीबाजी, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जायघोष्यात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.
गेल्या ६ दिवसांत नियमित पुजाअर्चा, आरती, प्रसाद अशा माध्यमातून सर्वांना सुख, शांती लाभू दे, महागाईचे संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना गणेशासह गौरीला केली.
निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी.
असे म्हणत आदर्श मराठा बॉईज च्या सदस्यांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.
No comments:
Post a Comment