![]() |
मराठी विद्या मंदिर शिप्पूर येथे स्नेह मेळाव्याला उपस्थित गुरुजन व विद्यार्थ्यी. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
मराठी विद्या मंदिर शिप्पूर या ठिकाणी एक आगळावेगळा स्नेह मिळावा संपन्न झाला. शाळेच्या स्थापनेपासून लाभलेले गुरुवर्य व माजी विद्यार्थी यांचं स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. शाळेच्या स्थापनेपासून ते २०२५ पर्यंत लाभलेले सर्व गुरुवर्य व सर्व माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आज गेट-टुगेदरची संकल्पना विस्तारत असताना केवळ एका वर्गापुरता मेळावा मर्यादित न राहता या छोट्याशा गावात सर्व माजी विद्यार्थी एकत्र येऊन एका विचारधारेने प्रेरित होऊन या कार्यक्रमाचे नियोजन करतात. याचा सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यामंदिर शिप्पूर या पटांगणात सर्व माजी व आजी शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. ४५ ते ५० विद्यार्थी एकत्र आणण्याचं काम उदय पाटील व त्यांचे सर्व मित्र यांनी केले. या कार्यक्रमाला संभाजी दादाजी पाटील, राजाराम ब्रह्म चौगुले, आनंदा कुंभार, धनाजी रावण, भास्कर दिनकर पाटील, शंकर बोरगुले, स्नेहल वाघमारे, आनंदराव पाटील, सुभाना शिंदे, बाबुराव गावडे हे सर्व माजी शिक्षक उपस्थित होते.
अंगणवाडी सेविका सुधा पवार, सविता गावडे, माधवी भोगूलकर या सर्व मान्यवरांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सरस्वतीची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला. या सत्कार प्रसंगी सर्व गुरुवर्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. हा कार्यक्रम आपल्या जीवनातील एक अविस्मरणीय प्रसंग असल्याची प्रतिक्रिया सर्व मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संकल्पना उदय पाटील यांनी मांडली. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी भारावून गेले. प्रल्हाद सिताप, आकाश पाटील, सतीश सिताफ, किरण पाटील, भगवंत पाटील, पांडुरंग पाटील, अमोल पाटील, संदीप पाटील, रुक्माणा पाटील, उत्तम पाटील, संदीप सिताप यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पि. के. पाटील यांनी केले तर आभार प्रमोद पाटील यांनी मांडले.
No comments:
Post a Comment