![]() |
कबड्डी व हॉलीबॉल खेळातील जुन्या खेळाडूंचा सन्मान करताना मान्यवर |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षक संघटना नेते शंकर मनवाडकर यांच्या संकल्पनेतून चंदगड तालुक्यातील माजी व्हॉलीबॉल व कबड्डी पट्टूंचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला. कोवाड (ता. चंदगड) येथील श्री मंगल कार्यालय येथे माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात या दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये आपल्या उमेदीच्या काळात योगदान दिलेल्या कोवाड, निट्टूर, किणी, कागणी, तेऊरवाडी, कालकुंद्री, मजरे कार्वे, रामपूर, हुंदळेवाडी, कुदनूर, मलतवाडी, माणगाव, घुल्लेवाडी, म्हाळेवाडी, नागरदळे, मांडेदुर्ग, शिवणगे, सरोळी, ढोलगरवाडी, चंदगड आदी गावांतील खेळाडूंचा पदक व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
दौलत कारखाना बुडवणाऱ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध त्यांनी हल्लाबोल केला. अथर्व चे चेअरमन खोराटे यांनी बंद पडलेला कारखाना चालू करून तालुक्यावर एक प्रकारे उपकारच केले आहेत. गेल्या पाच सहा वर्षात त्यांनी सर्व देणे भागवून किमान सात-आठ कोटी रुपये नफा मिळवला असेल. मग ४० वर्षे कारखाना चालवणाऱ्यांनी किती नफा मिळवला व किती नफा खाल्ला असेल? तरीही साडेतीनशे कोटी कर्ज करून शेतकऱ्यांची दौलत बुडवली. अशा प्रवृत्तींना तालुक्यात जागोजागी जाब विचारला पाहिजे. पण ते राजरोस हिंडत आहेत, हे आपल्या तालुक्याचे दुर्दैव महावे लागेल. तालुक्यात ऊस वजन काटा मारी मधून शेतकऱ्यांची लूट होत आहे की नाही? हे कळण्यासाठी तालुक्यात एक तरी स्वतंत्र वजन काटा उभारला पाहिजे. असा आग्रह त्यांनी व्यक्त केला. तरच चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. असेही मनवाडकर यांनी ठासून सांगितले.
यावेळी भारतीताई जाधव यांनी क्रीडा क्षेत्रातही तरुण-तरुणींना करिअरच्या भरपूर संधी असल्याने त्यांनी आवडीच्या खेळात प्राविण्य प्राप्त करावे. असे आवाहन केले. यावेळी चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक पुढारीचे पत्रकार श्रीकांत पाटील, आर. के. न्यूज चॅनेलचे संपादक निवृत्ती हरकारे, निंगापा बोकडे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी स्टेजवर माजी जि प सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण, एम. जे. पाटील, शिवाजी बुच्चे, जंगमहट्टी चे माजी सरपंच विष्णू गावडे, जिल्हा आदर्श गाव पुरस्कार प्राप्त झांबरे गावचे सरपंच विष्णू गावडे, पांडुरंग बेनके, बी. के. पाटील, अनिल शिवणगेकर, पुंडलिक वर्पे, प्रा. संजय पाटील (शिवणगे), ईश्वर पाटील, वसंत जोशीलकर, राजाराम जोशी, दत्तु कदम, विलास मारुती पाटील, पाडुरंग जाधव, नामदेव पाटील, पुंडलिक व्हन्याळकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मॅरेथॉनपटू चंद्रकांत मनवाडकर, यशवंत सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन एन. व्ही. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणपत लोहार, मधुकर कोकितकर, बसवानी शिरगे, विनायक पाटील, पुंडलिक चोपडे, मात्रू गावडे आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment