![]() |
श्रीकांत पाटील यांना सन्मानित करताना पदाधिकारी |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री कलमेश्वर विकास सेवा संस्थेची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्था इमारत सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन अशोक रामू पाटील होते. स्वागत व्हा. चेअरमन प्रताप आनंदराव पाटील यांनी केले.
![]() |
के. जे. पाटील यांचा सन्मान करताना पदाधिकारी |
ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते फोटो पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. अहवाल वाचन सेक्रेटरी श्रीकांत लक्ष्मण कदम यांनी केले. संस्थेला अहवाल सालात ९ लाख ८८ हजार रुपये नफा झाला असून सभासदांना ६ टक्के प्रमाणे डिव्हिडंड जाहीर करण्यात आला होता. तथापि सभेत ७ टक्के लाभांश देण्याची सभासदांची मागणी मान्य करण्यात आली. यावेळी इयत्ता, चौथी, सातवी, दहावी व बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या सभासदांच्या मुलांना स्मृतिचिन्ह व बक्षीे देण्यात आली. तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विविध पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल तसेच त्यांची चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष व डिजिटल मीडिया जिल्हा कार्यकरणी सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल तर प्राथमिक शिक्षक के. जे. पाटील यांना उत्कृष्ट लेखक पुरस्कार मिळाल्याबद्दल दोघांचा चेअरमन, व्हाईस चेअरमन व सदस्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन संचालक अरविंद कोकीतकर यांनी केले.
![]() |
उपस्थित सभासद वर्ग. |
यावेळी संचालक संजय नारायण पाटील, हरीबा जोती पाटील, विष्णू मारुती पाटील, परशराम बाबू जोशी. शिवाजी कृष्णा नाईक, सुरेश दत्तू परीट, कलाप्पा कांबळे शोभा धोंडीबा पाटील, सुरेखा मधुकर पाटील व सभासदांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी सुभाष कृष्णा पाटील, राजाराम साताप्पा पुजारी, मोहन लक्ष्मण नाईक आदींनी परिश्रम घेतले. संचालक व माजी चेअरमन विनोद अशोक पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment