![]() |
सोनाप्पा दत्तू कोकितकर |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
बुक्कीहाळ बुद्रुक (ता. चंदगड) गावचे रहिवासी व विद्या मंदिर करेकुंडी (ता. चंदगड) शाळेतील कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्व, हरहुन्नरी उपक्रमशील पदवीधर विषय शिक्षक सोनाप्पा दत्तू कोकितकर यांना सातारा येथील अविष्कार फौंडेशनचा 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार' जाहीर झाला आहे.
कोकितकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, संगीत क्षेत्रातील कार्य, समाजात वावरताना शेतकऱ्यांना शेती व सहकार संबंधित केलेले मार्गदर्शन, एक सर्पमित्र म्हणून पर्यावरण विषयक केलेली जनजागृती या सर्व कार्यांची एकत्रित दखल घेऊन नुकताच त्यांना दैनिक पुढारी वृत्तपत्र समूहमार्फत दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. लवकरच या पुरस्काराचे शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते कोल्हापूर येथे वितरण होणार आहे. तत्पूर्वीच दैनिक पुढारीने कोकीतकर यांच्या कार्याची घेतलेली दखल सार्थ ठरवत अविष्कार फाउंडेशनने त्यांची 'राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५' साठी निवड केली आहे.
या पुरस्काराचे वितरण शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजता यशोदा टेक्निकल कॅम्पस, वाढे फाटा- सातारा, येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
एकाच महिन्यात मानाच्या सलग दोन पुरस्कारांसाठी निवड झाल्याबद्दल सोनाप्पा दत्तू कोकितकर यांच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment