
कोवाड येथील कला.वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय
कोवाड / सी एल वृत्तसेवा
कोवाड (ता.चंदगड) येथील सर्वोदय शिक्षण संस्था संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा उद्या मंगळवारी (दि. १६ रोजी) ३० वा वर्धापन दिन महाविद्यालय सभागृहात होणार आहे. सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला 'नाबार्ड'चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात प्रमुख पाहुणे असणार आहेत अशी माहिती संस्थेचे सचिव एम. व्ही. पाटील यांनी दिली.
यावेळी भरमूआण्णा सुबराव पाटील (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), गोविंद प्रभू पाटील (खजिनदार, सर्वोदय शिक्षण संस्था, कोवाड), डॉ. पी. बी. पाटील (माजी प्राचार्य, कर्मवीर हिरे महा. गारगोटी), प्रा. एन. एस. पाटील (संचालक, सर्वोदय शिक्षण संस्था, कोवाड), एस. एम. फर्नांडिस (सहसचिव, सर्वोदय शिक्षण संस्था, कोवाड) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी सर्व आजी - माजी विद्यार्थी, संस्थेचे हितचिंतक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्र .प्राचार्य डॉ.व्हि.आर.पाटील आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. ए. के. कांबळे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment