सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी पेन्शन रखडली, शासनाकडे कर्मचारी सेवा समितीचा पत्रव्यवहार - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2025

सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी पेन्शन रखडली, शासनाकडे कर्मचारी सेवा समितीचा पत्रव्यवहार



चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    सेवानिवृत्त जेष्ठ व वयोवृद्ध नागरिकांना त्यांचे सेवानिवृत्ती वेतन वेळेत मिळणे हे घटनेच्या कलम ३६६ (१७) अन्वये बंधनकारक आहे. तथापि ऐन सणासुदीच्या दिवसांत सेवानिवृत्तांना पेन्शन अभावी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

   सन २०२५- २६ साठी प्रशासकीय अनुदाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झालेली आहेत. परंतु माहे सप्टेंबर २०२५ चे प्राथमिक शिक्षकांचे निवृत्ती वेतन देयकांसाठीचे अनुदान अद्याप जि. प. कडे शासनाकडून प्राप्त झालेले नाही. परिणामी दसरा सणाच्या तोंडावर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची ससेहोलपट होत आहे.

  याबाबत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समिती चे राज्य अध्यक्ष सुबराव रामचंद्र पवार व पदाधिकाऱ्यांनी मंत्रालय, महाराष्ट्र शासनाच्या अर्थ विभाग, लेखा विभाग, शिक्षण व संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून निवृत्तीवेतन निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा. अशी विनंती केली आहे. या आशयाचे प्रसिद्धीपत्रक राज्याध्यक्ष सुबराव पवार यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

No comments:

Post a Comment