बापूसाहेब शिरगावकर यांना छत्रपती शाहू महाराज जीवन गौरव पुरस्काराने कोल्हापूर येथे सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

27 October 2025

बापूसाहेब शिरगावकर यांना छत्रपती शाहू महाराज जीवन गौरव पुरस्काराने कोल्हापूर येथे सन्मानित


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त" मराठी पाऊल पडते पुढे" गौरव गाथा सन्मान सोहळा कोल्हापूर २०२५ चा ""छत्रपती शाहू महाराज जीवन गौरव ""पुरस्कार  अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे सदस्य, भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष बापूसाहेब शिरगावकर यांना कोल्हापूर येथील छत्रपती शाहू भवनामध्ये प्रदान करण्यात आला.

        मराठी स्वाभिमानाची तेजस्वी गाथा आपल्या पुण्यभूमीत कार्य कर्तुत्वाने समाजाला निस्वार्थी दिशा देण्याचे कार्य आपण करीत आहात.. त्यामुळे हा पुरस्कार आपल्या कार्यातील समर्पण, सेवाभाव आणि समाजप्रतीत असलेल्या कर्तव्यनिष्ठेची दखल म्हणून प्रदान करण्यात येत आहे. अशीच आपली गौरव गाथा भावी वाटचालीस प्रेरणादायी ठरेल. अशा भावना निवड समितीने व्यक्त केल्या. यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषण राजे होळकर, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते संजय मोहिते, स्वातीताई सरडे विसावा आश्रम पुणे संस्थापिका.. नियोजन मंडळाचे अध्यक्ष  आमदार राजेश क्षीरसागर... यशवंत शेळके प्रदेशाध्यक्ष, ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फेडरेशन अध्यक्ष व प्रा. डॉ. बी. एन. खरात यासह मान्यवर उपस्थित होते.

        गेली १४ वर्षे ह्युमन राइट्सच्या माध्यमातून शिरगावकर हे समाजाची सेवा करत आहेत. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे चंदगड तालुका अध्यक्ष म्हणून देखील त्यांची नुकताच निवड झाली आहे. व्यवसायाने विमा क्षेत्रात काम करणारे शिरगावकर यांनी आपल्या व्यवसायात प्रामाणिकपणे काम करत आपली एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. अध्यात्मिक क्षेत्रात देखील त्यांची एक वेगळी अशी ओळख आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचा आढावा घेत अतिशय मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा छत्रपती शाहू  पुरस्कार हा प्रदान करण्यात आला असून तालुक्यासह जिल्ह्यात यांचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment