कोवाडच्या अनंत भोगण यांच्याकडून कालकुंद्री सार्वजनिक वाचनालयास लोखंडी कपाट प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

29 October 2025

कोवाडच्या अनंत भोगण यांच्याकडून कालकुंद्री सार्वजनिक वाचनालयास लोखंडी कपाट प्रदान


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

        कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाला कोवाड येथील श्रीराम विद्यालयचे शिक्षक अनंत मनोहर भोगण यांनी पुस्तके ठेवण्यासाठी कपाट भेट दिले. कालकुंद्री हे आजोळ असलेल्या अनंत भोगण यांनी आपले आजी आजोबा कै. कृष्णा भिकू पाटील व कै. मुक्ताबाई कृष्णा पाटील (भिकापगावडे) यांच्या स्मरणार्थ दिलेली ही भेट वाचन चळवळीला बळकटी देणारी ठरेल.

      कपाट प्रदान प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते एम्. जे. पाटील, केंद्रप्रमुख ज. ल. पाटील यांच्या हस्ते भोगण यांचा शाल, पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

      भोगण यांनी  या विनाअनुदानित वाचनालयाच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. यावेळी एम् .जे पाटील, जे. एस्. पाटील, जोतीबा पाटील, विनायक कांबळे, सुरेश नाईक आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी ग्रा.पं. सदस्य प्रशांत मुतकेकर, विलास शेटजी, सेवा सोसायटी व्हा.चेअरमन अरविंद कोकीतकर, भरमू पाटील, सेवानिवृत्त  शिक्षक जोतीबा पाटील, संशोधक विठोबा पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक कालकुंद्रीकर, शंकर मुर्डेकर, सुभाष पाटील,अशोक वर्पे,  अर्जून पाटील, रवी पाटील, कल्लापा कांबळे, नारायण पाटील, एस्.के.कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत प्रा. व्ही. आर. पाटील व पी.एस्.कडोलकर यांनी केले. प्रास्ताविक के. जे. पाटील यांनी तर सुत्रसंचालन युवराज पाटील यांनी केले. एस्. एस्. खवणेवाडकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment