चंदगड सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सुनिल काणेकर यांना राष्ट्रसेवा सन्मान पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

29 October 2025

चंदगड सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सुनिल काणेकर यांना राष्ट्रसेवा सन्मान पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान

 

सुनील सुभाष काणेकर

संपत पाटील, चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

राष्ट्राच्या हितासाठी………….सर्वांच्या सेवेसाठी !! पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मराठी पाऊल पडते पुढे गौरवगाथा सन्मान सोहळा, कोल्हापूर २०२५ यांच्या वतीने चंदगड सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सुनिल सुभाष काणेकर यांना राष्ट्रसेवा सन्मान पुरस्कार देवून कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

    मराठी स्वाभिमानाची तेजस्वी गाथा आपल्या पुण्यभूमीत कार्यकर्तृत्वाने समाजाला निस्वार्थ दिशा देण्याचे कार्य करीत आहात. त्यामुळे हा पुरस्कार कार्यातील समर्पण, सेवाभाव  आणि समाजप्रती असलेल्या कर्तव्यनिष्ठेची दखल म्हणून प्रदान करण्यात येत आहे. 

    सुनिल काणेकर हे एक उद्योजक तर आहेतच. त्याचबरोबर समाजातील अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्यास ते नेहमी कार्यतत्पर असतात. स्वत: अडचणीत असतानाही स्वत:ची अडचणीचा बाऊ न करता त्या काळतही त्यांना समाजातील अनेक घटकांना आपल्या परीने मदत केली आहे. कोरोना काळात घरची मंडळी कोरोना रुग्णांनापासून दुर पळत असताना त्यांनी जिवाची पर्वा न करता औषधांच्या माध्यमातून लोकांच्या सानिध्यात जाऊन प्रत्यक्ष त्यांची निस्वार्थी सेवा केली आहे. पर्यावरण रक्षण व समाज सुधारणेच्या कामातही त्यांचा नेहमी हिरीरिने सहभाग असतो. आयुर्वेदांच्या माध्यमातून उपचार करुन अनेक रुग्णांना जगण्याची नवी आशा निर्माण केली आहे. विविध ऋतु मधील बदलाचा माणसाच्या जीवनावर परिणाम होत असल्याने नैसर्गिक गोष्टीचा वापर करुन निरोगी कसा राहता येईल, यासाठी ते वर्षभर अनेक ठिकाणी मार्गदर्शन करत असतात. 

        श्री. काणेकर यांच्या या स्वभावामुळे अनेक लोक त्यांच्याशी विविध माध्यमातून जोडले गेले आहेत. राजकारण, समाजकारण व आयुर्वेद या माध्यमातून त्यांची समाजाशी नाळ अधिक घट्ट होत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत मराठी पाऊल पडते पुढे गौरवगाथा सन्मान सोहळा, कोल्हापूर यांच्या वतीने त्यांना राष्ट्रसेवा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 

No comments:

Post a Comment