म्हाळेवाडीचे निवृत्त वनाधिकारी आर. एस. पाटील यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

29 October 2025

म्हाळेवाडीचे निवृत्त वनाधिकारी आर. एस. पाटील यांना पितृशोक

सुबराव राणबा पाटील
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

        म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक सुबराव राणबा पाटील (वय ९६) यांचे बुधवारी (दि. २९) सायंकाळी सात वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र शासनाचे निवृत्त वनक्षेत्रपाल आर. एस. पाटील यांचे ते वडील होत. तर हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे निवृत्त अभियंता तुकाराम पाटील यांचे ते सासरे होत. त्यांच्यावर गुरुवारी दि. ३० रोजी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 


No comments:

Post a Comment