सह्याद्री सोसायटी कोवाड शाखेच्या अध्यक्षपदी बाबुराव जाधव तर उपाध्यक्षपदी परशराम सरवणकर यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2025

सह्याद्री सोसायटी कोवाड शाखेच्या अध्यक्षपदी बाबुराव जाधव तर उपाध्यक्षपदी परशराम सरवणकर यांची निवड

बाबुराव जाधव


परशराम सरवणकर

कोवाड / सी एल वृत्तसेवा

    सह्याद्री मल्टिपर्पज को - ऑप. सोसायटी लि.बेळगाव (मल्टिस्टेट) च्या नुकत्याच पार पडलेल्या सभेमध्ये सन २०२५-२६ चालू साला करिता नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

  नूतन अध्यक्षपदी बाबुराव गणपती जाधव, कुदनूर तर उपाध्यक्ष पदी परशराम रामचंद्र सरवणकर (मलतवाडी) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष स्थानी जनार्दन देसाई होते. त्याचबरोबर शाखा व्यवस्थापक महेश चव्हाण, शाखेचे सर्व सल्लागार, कर्मचारी, पिग्मी संकलक उपस्थित होते. आभार प्रदर्शन यावेळी शाखेचे ज्येष्ठ सल्लागार मारुती पाटील यांनी मांडले. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment