![]() |
| प्रशांत पाटील |
चंदगड येथील प्रशांत पाटील यांची ग्रामीण विकास मिशनच्या कोल्हापूर जिल्हा “प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर” पदी निवड करण्यात आले आहे. निवडीचे पत्र सचिव, ग्रामीण विकास मिशन भारत यांनी त्यांना नुकतेच देण्यात आले.
या प्रोजेक्टमध्ये a) शिक्षण आणि कौशल्य विकास प्रशिक्षण, b) ग्रामीण विकास, c) कृषी विकास, d) रोजगार, e) महिला सक्षमीकरण, f) आरोग्य, g) पर्यावरण, h) जलसंधारण, i) सामाजिक-आर्थिक विकास, j) प्रथा व संस्कृती, k) क्रीडा व मनोरंजन, l) पशुपालन विकास या गोष्टीच्या विकासाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.ग्रामीण विकास मिशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य निवड समिती मंडळामध्ये श्री. पाटील यांचा समावेश केला आहे. त्यांच्यावर सार्वजनिक क्षेत्राशी व सरकारी अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याची जबाबदारी आहे. निवड पत्रामध्ये मिशनचे तत्त्वज्ञान, उद्दिष्टे व ध्येये समजून घेवून "अपना साथ, अपना विकास" या घोषवाक्याखाली भारताच्या (भारताच्या ग्रामीण भागाच्या) विकासासाठी योगदान देण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.


No comments:
Post a Comment