गोवा : सी. एल. वृत्तसेवा
सिध्दी, पोर्तुगीज आणि इंग्रजांना त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारा, परकिय सत्तांचा कर्दनकाळ मराठ्यांचा राजा छत्रपती संभाजी महाराज यानी २४ नोहेंबर १६८३ रोजी पोर्तुगीज राजवटील जुवे बेटावर हल्ला करुन अवघ्या अर्धातासात पोर्तुगीज गव्हर्नर 'कोंद द अल्वार' याला सळो की पळो करून जूवेबेट स्वराज्यात सामील केले. तसेच याच महिन्यात (२७ नोहेंबर १६५९ रोजी) छत्रपती शिवाजी महाराांनी जावळीच्या खोऱ्यातील किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी धिप्पाड , कपटी अफझल खानाचा वध केला.
या दोन्ही घटनांच्या स्मृतीस प्रित्यर्थ सडा- मुरगाव (गोवा), येथे राष्ट्रीय महामार्गावरील श्री दत्तात्रय सेवा मंदिर शेजारी असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून करून भगवा ध्वज फडकवला. सुरुवातीस परिसरातील शिवभक्त नागरिक तसेच कोल्हापूर येथून गोवा येथे शैक्षणिक सहल साठी गेलेले विद्याधन कोचिंग क्लासेस चे ५० विद्यार्थी व विद्यार्थीनींनी श्रमदानातून परिसर स्वच्छता केली.
दि. २३ /११/ २०२५ पार पडलेल्या या कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन सुत्रसंचलन गोवा शिपयार्डचे प्रशासकीय अधिकारी राजन केरकर यानी केले. छत्रपती संभाजी महाराजाची करडी नजर पोर्तुगीजांवर असल्यामुळेच गोमंतकातील हिंदुसंस्कृतीचे रक्षण झाले. असे प्रतिपादन प्रास्ताविक करताना अजित कांबळी याने काढले. यावेळी विद्याधन कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी शौर्य गीते गायली. विद्यार्थ्यांनी केलेले श्रमदान व पराक्रमी वीरांच्या पराक्रमाची आठवण म्हणून त्यांना दिलेली मानवंदना याबद्दल संभाजी सावंत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी पत्रकार सौ नयनाताई केरकर राजाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय मेस्री, जगनाथ बेहेरे, शिवा परब, नरहरी साळगांवकर, संजय घावरे , शलाका मेस्री, आनंदी कांबळी,निशल उस्कैकर, अरूण केरकर, अनिषा कांबळी, ज्योती मांद्रेकर, अशोक शिंदे, वासुदेव रेडकर, रामेश्वरी रेडकर गुणा रेडकर, सुहानी परब, विनोद नाईक, अजित पार्सेकर ,प्रकाश पालव, शमिका मेस्त्री, संतोष शेटकर, राहुल यादव यांनी योगदान दिले. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. निलेश पाटील यानी आभार मानले.

No comments:
Post a Comment