मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्र व देश पातळी क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या 'आऊट प्ले स्पोर्ट्स फाउंडेशन' तर्फे रविवार दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता “डहाणू–बोर्डी बीच मॅरेथॉन आणि बीच क्लीन-अप ड्राईव्ह २०२५”, हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्पोर्ट्स-फॉर-सोशल-गुड कार्यक्रम पालघर जिल्ह्यातील डहाणू–बोर्डी अरबी समुद्र किनाऱ्यावर आयोजित करण्यात आला आहे.
हा उपक्रम आऊट प्ले स्पोर्ट्स फाउंडेशनच्या “निसर्ग रक्षक तथा गार्डियन ऑफ नेचर ” चळवळीचा भाग असून या उपक्रमाची ऐतिहासिक 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. “एका ठिकाणी, एका दिवशी सर्वाधिक स्वयंसेवकांनी केलेली किनारपट्टी स्वच्छता मोहीम” या श्रेणीसाठी या उपक्रमात १०,००० पेक्षा अधिक धावपटू, एनसीसी, एनएसएस स्वयंसेवक, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत.
निसर्गरक्षक मोहिमेने 'स्वच्छ किनाऱ्याकडे पाऊल' हे ब्रीदवाक्य घेऊन आउटप्ले स्पोर्ट्स फाऊंडेशन डहाणू–बोर्डी बीच मॅरेथॉन आणि बीच क्लीन-अप ड्राईव्ह २०२५ चे आयोजन करत आहे. हा उपक्रम खेळ, आरोग्य आणि पर्यावरण या तिन्ही घटकांचा संगम असलेल्या या उपक्रमात पालघर जिल्हा प्रशासन, वन विभाग, पोलीस, कोस्ट गार्ड आणि स्थानिक शैक्षणिक संस्थांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. देशभरातील धावपटूंना ही पर्वणी ठरणार आहे.
स्पर्धेतील प्रकार पुढील प्रमाणे-
१) ५ कि.मी. – वेव्ह रन 🌊 (प्रत्येक लहरीने बदल घडवूया),
२) १० कि.मी. – मॅन्ग्रोव्ह रन 🌴 (समुद्रकिनाऱ्याच्या बळकट पाऊलवाटा),
३) २१ कि.मी. – ब्ल्यू प्लॅनेट हाफ मॅरेथॉन 🌍 (स्वच्छ, हिरव्या पृथ्वीसाठी धावूया)
स्वच्छतेच्या या अतिविशाल व अभूतपूर्व उपक्रमातून संकलित झालेला प्लास्टिक कचरा रीसायकल करून आदिवासी व ग्रामीण भागातील शाळांसाठी बसण्यासाठी प्लास्टिक बेंच तयार करून दान केले जाणार आहेत.
स्पर्धा व उपक्रमात प्रवेशासाठी नोंदणी सर्वांसाठी मोफत असून नोंदणी व अधिक माहितीसाठी
www.outplaysports.org/dahanu-bordi-beach-marathon
support@outplaysports.org
| outplaysportsfoundation@gmail.com
9324 29 2727 / 7977 66 2944
🌐 www.outplaysports.org
वर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment