![]() |
| कार्यालय शुभारंभ प्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार शिवाजी पाटील |
गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा
गडहिंग्लज नगर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने सुरु करण्यात आलेल्या जनतादल-जनसुराज्य-भाजपा- शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उपस्थित राहून भाजपा व मित्र पक्षांच्या सर्व उमेदवारांना या निवडणुकीसाठी मार्गदर्शन केले व गडहिंग्लज नगरपरिषद निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार केला.
यावेळी श्रीशैल अप्पी उर्फ विनायक पाटील, सौ.स्वाती कोरी (प्रमुख जनता दल), रमेश रिंगणे (प्रमुख जनसुराज्य पक्ष), संजय संकपाळ (प्रमुख शिवसेना शिंदे गट), नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाधर राजशेखर हिरेमठ (महाराज), महेश उर्फ बंटी कोरी, बाळासाहेब गुरव, आप्पा शिवणे, अनिल खोत, कुमार पाटील, प्रितम कापसे, राजेंद्र तारळे, बाळ उर्फ माधव पोटे पाटील, सागर गंधवाले, विजय फुटाणे, सचिन घुगरी, सौ. बिनादेवी कुराडे, चिन्मय देशपांडे, अनिकेत बेल्लद तसेच भाजपा, जनता दल, जनसुराज्य, शिवसेना (शिंदे गट) प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment