मृत्यूचा सापळा बनलेल्या बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याची दुरुस्ती त्वरित करा, अन्यथा आंदोलन - अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती - चंदगड लाईव्ह न्युज

18 November 2025

मृत्यूचा सापळा बनलेल्या बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याची दुरुस्ती त्वरित करा, अन्यथा आंदोलन - अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष धीरज रुकडे व जिल्हाध्यक्ष कयेश पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली  चंदगड समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मृत्यूचा सापळा बनलेल्या बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याची दुरुस्ती त्वरित करा, अन्यथा आंदोलन करु असा इशारा उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र शासन यांना निवेदनातून दिला आहे. 

    बेळगाव-वेंगुर्ला राज्य मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते.  पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. अक्षरश: रस्त्याची चाळण झाली आहे. कोणता खड्डा चुकवावा हेच वाहन चालवणाऱ्याला समजत नाही. यामुळे अनेक वाहनाचे अपघात झाले आहेत. अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झाली असतानाही अद्याप रस्ता दुरुस्त झाला नाही. तीन-चार वेळा खड्डे भरण्यात आले, पण ते टिकले नाहीत. त्यामुळे याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढून रस्ता पक्का करावा. यासाठी समितीच्या सदस्यांनी आज निवेदन दिले.  

     त्वरित कामाला सुरुवात  न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल आणि ही वेळ येऊ नये अशी विनंती करण्यात आली. यावेळी डिपार्टमेंट कडून त्वरित रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन देण्यात आले. सदर निवेदनाची प्रत तहसीलदार राजेश चव्हाण यांनाही देण्यात आली आहे.

    यावेळी समितीचे अध्यक्ष बापूसाहेब शिरगावकर, उपाध्यक्ष डॉ. विठ्ठल कोठारी, सचिव सुरेश दळवी, नागनवाडी विभाग प्रमुख विलास कुमार विंझनेकर, हलकर्णी विभाग प्रमुख मनोज कांबळे, कानूर विभाग प्रमुख मेजर रंनजीत गावडे व सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद कांबळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment