चंदगड : सी. एल वृत्तसेवा
'चंदगड नगरपंचायत निवडणूक २०२५' आज अर्ज माघारीच्या दुसऱ्या दिवशी ५ उमदेवारांचे ६ अर्ज माघारी घेण्यात आले. यामध्ये नगराध्यक्ष पदाचे २ तर नगरसेवक पदाच्या ३ उमेदवारांनी एकूण ४ अर्ज माघारी घेतले आहेत. अशी माहिती निवडणूक विभाग तहसील कार्यालय चंदगड यांच्याकडून कळविण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. २१) अर्ज माघारीची शेवटचा दिवस असल्याने या दिवशी माघारी साठी गर्दी होण्याची शक्यता आहे. आजच काही उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने प्रशासनावरील काहीसा ताण कमी झाला आहे.
अर्ज माघारी घेतलेल्या उमेदवारांमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार- प्राची दयानंद काणेकर (१ अर्ज) व संजय कृष्णा चंदगडकर (१ अर्ज) तर नगरसेवक पदाच्या उमेदवारी अर्ज माघार घेतलेल्यांमध्ये सुनिल गणपती हजगुळकर (वार्ड क्र. १७ मधून १ अर्ज), मनोहर कृष्णा गडकरी (वार्ड क्र. ११ मधून २ अर्ज), सुधा मनोहर गडकरी (वार्ड क्र. १४ मधून १ अर्ज) यांचा समावेश आहे.
उद्या अर्ज माघारी घेण्यासाठी अंतिम मुदत असल्याने उद्या शुक्रवार सायंकाळ नंतरच नगराध्यक्षपदाची लढत दुरंगी की तिरंगी व नगरसेवकांसाठीच्या लढती दुरंगी की बहुरंगी होणार हे निश्चित होईल. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस व मित्र पक्षांच्या राजश्री शाहू आघाडी विरोधात भाजपचे पॅनेल अशी लढत अपेक्षित असताना तिसरे पॅनेल म्हणून शिवसेना शिंदे गटाचे तिसरे पॅनेल निवडणूक रिंगणात उतरले आहे. या पॅनलमध्ये संपूर्ण १७ उमेदवार नसले तरी आहेत त्या उमेदवारांशी लढत देण्याचा निर्धार पॅनल प्रमुखांनी केला आहे. या सर्व शक्यतांवर उद्या संध्याकाळपर्यंत शिक्कामोर्तब होईल.

No comments:
Post a Comment