
चंदगडच्या प्राथमिक शिक्षण सेवक पतसंस्थेवर निवड झालेल्या चेअरमन व व्हा चेअरमन यांचा सत्कार करताना मान्यवर
चंदगड / सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुका प्राथमिक शिक्षक व शिक्षण सेवक पतसंस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी प्रथमच महिलांची निवड करण्यात आली.
यावेळी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेत सर्वानुमते नूतन चेअरमन सौ. मनीषा सदाशिव कोळी (अध्यापिका कुमार विद्यामंदिर चंदगड) तर व्हाईस चेअरमन पदी सौ.पूजा बाळकृष्ण तुपारे (कन्या विद्यामंदिर चंदगड) यांची एकमताने निवड करण्यात आली.
दोन्ही महत्वाच्या पदावर महिलांचीच निवड करून एक वेगळा आदर्श या संस्थेने निर्माण केला आहे. खरं तर महिला अतिशय काटकसरीने आणि चिकाटीने कारभार सांभाळत असतात. नक्कीच त्यांचा उपयोग या संस्थेच्या प्रगतीसाठी होईल. आपली संस्था आणखीन भरारी घेईल अशी मनोगते या निवडीवेळी उपस्थित मान्यवरानी केली.
यावेळी संस्थेचे संस्थापक प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते शंकरराव मनवाडकर, माजी चेअरमन महादेव नाईक, माजी व्हाईस चेअरमन गुंडू दळवी संचालक प्रवीण साळुंखे, निवृत्ती तिबिले, रमेश नाडगौडा, रामचंद्र प्रभू, रमेश कांबळे, वैजनाथ शिवनगेकर आणि संस्थेचे मानद सचिव आणि एक तज्ञ संचालक विनायक प्रधान उपस्थित होते.
No comments:
Post a Comment