चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
बागिलगे (ता. चंदगड) येथील श्री देव रवळनाथ यात्रा शुक्रवार दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी होणार असल्याची माहिती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष एस. बी. पाटील व सरपंच नरसू पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
बागिलगे पंचक्रोशीतील बागिलगे, रामपूर, धुमडेवाडी, तांबुळवाडी, मजरे जट्टेवाडी, मौजे जट्टेवाडी, गुडेवाडी, नरेवाडी गावची श्री रवळनाथ यात्रा शुक्रवार दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी विविध धार्मिक विधीने होणार आहे.यात्रोत्सव काळात देवीची आरती,देवीची ओटी भरणे, गाऱ्हाणा, नवस फेडणे अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी श्री देव रवळनाथ यात्रेचा लाभ घ्यावा,असे आवाहन ग्रामस्थ मंडळामार्फत करणेत आले आहे.

No comments:
Post a Comment