तुर्केवाडी येथे सोमवारी बुद्धिबळ स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

07 December 2025

तुर्केवाडी येथे सोमवारी बुद्धिबळ स्पर्धा

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे सोमवारी (ता. ८) सकाळी १० वाजता तालुकास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पाचवी ते दहावीसाठी असून विजेत्यांना अनुक्रमे १५०१ रुपये, १००१ रुपये, ७०१ रुपये, ५०१ रुपये व प्रत्येकी सन्मानचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी रविवार (ता. ७) पर्यंत नावनोंदणी करावी. तसेच स्पर्धेला येताना आधारकार्ड व स्वतःचा चेसबोर्ड आणावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment