चंदगड नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २) मतदानसाठी १७ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. एकूण ८३१५ मतदार आहेत. यामध्ये पुरुष ४१७२ तर महिला मतदार ४१४३ इतक्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली. एकूण मतदान केंद्रापैकी केंद्र क्रमांक ३, ४, ५, ६, १०, ११, १२, १३ या ठिकाणी ८ बुरखाधारी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.
प्रभाग 1 साठी विनायकनगर रोड, अंगणवाडी खोली क्र. 53,
प्रभाग 2 साठी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग चंदगड पूर्वेकडून खोली क्र. 1,
प्रभाग 3 साठी उर्दू विद्यामंदिर पूर्व पश्चिम इमारत क्र. 3 पूर्वेकडून खोली क्र. 1,
प्रभाग 4 साठी दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड पूर्व पश्चिम जुनी इमारत, पूर्वेकडून खोली क्र. 3,
प्रभाग 5 साठी दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड पूर्व पश्चिम जुनी इमारत पूर्वी पूर्वेकडून खोली क्र. 5,
प्रभाग 6 जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग चंदगड पूर्वेकडून खोली क्र. 3,
प्रभाग 7 साठी कुमार विद्यामंदिर चंदगड दक्षिण उत्तर नवीन इमारत दक्षिणेकडून खोली क्र. 3,
प्रभाग 8 साठी कुमार विद्यामंदिर चंदगड दक्षिण उत्तर नवीन इमारत दक्षिणेकडून खोली क्र. 5,
प्रभाग 9 साठी गांधीनगर अंगणवाडी क्र. 56, साई मंदिर समोर,
प्रभाग 10 साठी कुमार विद्यामंदिर चंदगड पूर्व पश्चिम नवीन इमारत पूर्वेकडून खोली क्र. 2,
प्रभाग 11 साठी अंगणवाडी शाळा क्र. 54 कुमार विद्यामंदिर जवळ,
प्रभाग 12 साठी कन्या विद्या मंदिर चंदगड पश्चिम बाजू खोली क्र. 1,
प्रभाग 13 साठी कन्या विद्या मंदिर चंदगड पूर्व पश्चिम इमारत पूर्वेकडून खोली क्र. 4,
प्रभाग 14 साठी कन्या विद्या मंदिर चंदगड दक्षिण उत्तर नवीन इमारत उत्तरेकडून खोली क्र. 2,
प्रभाग 15 साठी रवळनाथ माध्यमिक विद्यालय चंदगड दक्षिण बाजू खोली क्र. 4,
प्रभाग क्र. 16 साठी देसाईवाडी अंगणवाडी क्र. 207, चंदगड,
प्रभाग 17 साठी रवळनाथ माध्यमिक विद्यालय, चंदगड, दक्षिण बाजू खोली क्र. 2.
या शिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
.jpg)

No comments:
Post a Comment