चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड वनपरिक्षेत्रातंर्गत मौ. चंदगड नजीक चंदगड हेरे रस्त्यालगत असलेल्या नायरा कंपनीच्या पेट्रोल पंपावर सिंह सदृश्य वन्यप्राणी आल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला असुन त्यामुळे नागरिकांमध्ये भिती व गैरसमज निर्माण झाले आहेत, सदर व्हिडीओ बाबत वनविभागामार्फत तात्काळ चौकशी करणेत आली आहे. तपासाअंती असे निष्पन्न झाले आहे कि, सदर व्हिडीओ पुर्णता खोटा / फेक असुन तो चंदगड परिसराशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही. चंदगड तालुका व आजुबाजुच्या वनक्षेत्रात सिंह या वन्यप्राण्याचे अस्तित्व नाही. सदरचा व्हिडीओ जुना, अन्य ठिकाणचा किंवा बनावट पध्दतीने प्रसारित केलेला आहे.
तसेच मौजे नागणवाडी येथील मालकी क्षेत्रामध्ये बिबट सदृश्य वन्यप्राणी आल्याचा फोटो समाज माध्यमांवर प्रसारित झाला असुन त्यामुळे नागरिकांमध्ये भिती व गैरसमज निर्माण होतात. सदर फोटो बाबत वनविभागामार्फत तात्काळ जाग्यावर जाऊन चौकशी करणेत आली आहे. तपासाअंती असे निष्पन्न झाले आहे कि, सदर फोटो पुर्णतः खोटा / फेक असुन तो नागणवाडी परिसराशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही.
नागरिकांना आवाहन करणेत येते कि, कोणताही वन्यप्राणी दिसल्यास तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी चंदगड कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन चंदगड परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment