सामाजिक वनीकरण चंदगड यांच्यावतीने "हरित सेना" विद्यालयांमध्ये पर्यावरण विषयक उपक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

12 January 2026

सामाजिक वनीकरण चंदगड यांच्यावतीने "हरित सेना" विद्यालयांमध्ये पर्यावरण विषयक उपक्रम संपन्न

चंदगड / सी एल वृत्तसेवा

    केंद्र शासनाच्या पर्यावरण अभ्यास उपक्रमांतर्गत, चंदगड व आजरा तालुक्यातील हरित सेनेच्या विद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले.

     माऊली हायस्कूल तिलरीनगर, धनंजय हायस्कूल नागनवाडी, शिवशक्ती हायस्कूल अडकुर, सरस्वती हायस्कूल हत्तीवडे, राजगोळी हायस्कूल राजगोळी, मामासाहेब लाड हायस्कूल ढोलगरवाडी, वैजनाथ हायस्कूल देवरवाडी व ब्रह्मलिंग हायस्कूल हाजगोळी  या विद्यालयांमध्ये प्लास्टिक व कचरा मुक्ती, हरित ऊर्जा, संवर्धन राखीव, मानव वन्य जीव संघर्ष, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शाश्वत जीवनशैली अशा विविध विषयांवर  पर्यावरणीय प्रकल्प, मार्गदर्शन व कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात आले होते.

    सदर उपक्रमांसाठी प्रा. ओंकार कुलकर्णी उपस्थित होते. वरील सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.

  कोल्हापूरचे विभागीय वन अधिकारी  किशोर येळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वनपाल सलीम मुल्ला, माणिक खोत वनरक्षक तानाजी भोसले जालिंदर गावडे वनसेवक खापरे व रवी पाटील इत्यादी सहभागी होते.

    यापुढेही हरित सेना विद्यालय व इतर विद्यालयांमध्ये विविध स्पर्धा, कार्यशाळा, निसर्ग भ्रमंती असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment