धारातिर्थ गडकोट मोहिमे संदर्भात शिवप्रतिष्ठान हिंन्दुस्थान बेळगाव ची बैठक चिकोडी येथे संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2026

धारातिर्थ गडकोट मोहिमे संदर्भात शिवप्रतिष्ठान हिंन्दुस्थान बेळगाव ची बैठक चिकोडी येथे संपन्न



बेळगाव : सी एल वृत्तसेवा 

   बेळगाव जिल्ह्यातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांची बैठक नुकतीच मराठा भवन चिक्कोडी येथे पार पडली. दारात तीर्थ गडकोट मोहिमे संदर्भात झालेल्या या बैठकीसाठी चिक्कोडी तालुक्यातील धारकरी व शिवभक्त उपस्थित होते. 

 कर्नाटक प्रांत प्रमुख किरणभाऊ गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील  यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत प्रचारक हिरामणी मुचंडीकर यांनी मार्गदर्शन केले. बैठकीची सुरुवात प्रेरणा मंत्राने झाली. संघटनेसाठी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी यावेळी घोषित करण्याबरोबरच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.  

  चिकोडी तालुका प्रमुखपदी  प्रशांत सुतार यांची  निवड झाली. चिकोडी तालुक्याचे ६ विभाग करण्यात आले.  सदलगा विभाग प्रमुख श्रीनाथ खोत, मांजरी विभाग प्रमुख चंद्रसेन कदम, एकसंबा विभाग प्रमुख लखन पोळ, सौंदत्ती विभाग प्रमुख सुमित गिरी, जनावाड विभाग प्रमुख नवनाथ बेनाडे, शमणेवाडी विभाग प्रमुख प्रदीप शिंदे या सर्वांची विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त प्रमुखांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे कार्य घरोघरी पोहोचवण्यासाठी गावनिहाय बैठका घेऊन गावप्रमुख नेमणे, येणाऱ्या गडकोट मोहिमेसाठी धारकरी बांधवांना तयार करणे व संघटनेच्या ध्येयधोरणाशी एकनिष्ठ राहून कार्यविस्तार करणेबाबत प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी मार्गदर्शन केले.  येत्या गडकोट मोहिमेत चिकोडी तालुक्यातील शेकडो धारकरी उपस्थित राहतील असा निर्धार मराठा भवन येथील या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment