चंदगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष सावंत भोसले तर उपाध्यक्षपदी राहूल पाटील यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2026

चंदगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष सावंत भोसले तर उपाध्यक्षपदी राहूल पाटील यांची निवड

संतोष सावंत-भोसले                                   राहुल पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष पदासाठी संतोष सावंत भोसले (संपादक - चंदगड टाईम्स) तर उपाध्यक्षपदी राहूल पाटील (संपादक - सत्यघटना) यांची सन २०२६-२०२७ या वर्षासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली. 

    चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण व पत्रकार दिनाचे औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमानंतर चंदगड तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारणीची बैठक संस्थापक अध्यक्ष उदयकुमार देशपांडे व अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत सन २०२६ व सन २०२७ वर्षासाठी ही निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीकांत पाटील आणि संस्थापक अध्यक्ष उदयकुमार देशपांडे यांच्या हस्ते अध्यक्ष सावंत भोसले व उपाध्यक्ष राहुल पाटील यांना पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थापक अनिल धुपदाळे, उत्तम पाटील, सागर चौगुले, संजय पाटील, मारुती पाथरवट, संजय के. पाटील, राजेंद्र शिवणगेकर, प्रदीप पाटील इत्यादी उपस्थित होते. शेवटी आभार सागर चौगुले यांनी मानले.

No comments:

Post a Comment