मनातला भारतीय जिवंत ठेवा – विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

18 January 2026

मनातला भारतीय जिवंत ठेवा – विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांचे आवाहन

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा

“पुन्हा एकदा भारत मातीत पेरला गेला, तरच उद्याचा खरा भारतीय उगवेल. माणूसकी हरवत चाललेल्या या काळात माणुसकीच्या नात्याने समाज उभा करण्याची गरज आहे. संवेदनशीलतेची बीजे घर आणि शाळा या दोन्ही माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या मनात रुजली पाहिजेत,” असे परखड प्रतिपादन विद्रोही कवी 'दंगलकार 'नितीन चंदनशिवे यांनी केले.

ते दि न्यू इंग्लिश स्कूल व न भू पाटील ज्युनिअर कॉलेज चंदगड येथे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांच्या विचारपूर्ण भाषणाने उपस्थित विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवर्ग भारावून गेला. ‘मनातला भारतीय मरू देऊ नका’ हा संदेश त्यांनी प्रभावी शब्दांत दिला.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जी. एस. पाटील होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच संस्कार, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी ॲड. एन. एस. पाटील यांनी ‘आजचा विद्यार्थी आणि त्याची कर्तव्ये’ या विषयावर विचार मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शैक्षणिक अहवाल वाचन प्राचार्य आर. पी. पाटील यांनी केले. शाळेच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा सविस्तर आढावा त्यांनी सादर केला.

याप्रसंगी यावर्षीचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार विद्यार्थीदशेत उत्कृष्ट कामगिरी करणारे विपुल कडूकर व कु. समिता कडूकर यांना प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच वर्षभरात विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, सचिव एम. एम. तुपारे, खजिनदार ए. व्ही. सुतार,प्रा आर . पी . पाटील,

 एस. एम. फर्नांडिस, श्री. रामाण्णा पाटील, डॉ. पी. आर. पाटील, एस व्ही सडेकर प्रा. बी. एम. शिंगाडे, प्रा. एस. एन. निळकंठ, प्रा. धायगुडे, प्रा एस एम शेख  जे जी पाटील, टी व्ही खंदाळे एस जे वर्पे, विद्या डोंगरे भाग्यश्री  पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संजय साबळे व अर्चना रेळेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन व्ही. एन. कांबळे यांनी मानले.

विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणारा हा समारंभ चंदगडच्या शैक्षणिक जीवनात एक संस्मरणीय ठसा उमटवून गेला.

No comments:

Post a Comment