चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराची मान्यवरांच्या उपस्थितीत दाटे येथे सांगता - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2026

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराची मान्यवरांच्या उपस्थितीत दाटे येथे सांगता

दाटे (ता. चंदगड) येथील विशेष श्रमसंस्कार शिबिराप्रसंगी पाहुण्यांचे पुप्षगुच्छ देवून स्वागत करताना  कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शाहू गावडे
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे आरोग्य स्वच्छ्ता श्रमसंस्कार व समाज परिवर्तन करणारे महत्वाचे केंद्र आहे असे प्रतिपादन खेडूत शिक्षण मंडळाचे संचालक प्रा. आर. पी. पाटील यांनी र. भा. माडखोलकर  महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीराच्या सांगता समारंभ प्रसंगी अधक्ष स्थानावरून केले. 

      गेले सात दिवस सुरू असलेल्या श्रमसंस्कार शिबिरामध्ये डॉ. विश्वनाथ पाटील. यांचे अध्यात्म विज्ञान आणि आजचा तरुण सौ. गीता कुट्रे यांचे आजची स्त्री अधिकार आणि कर्तव्य संतोष कुटवड व जिवन पालमपल्ले यांचे शासकीय कृषी योजना व सुधारित शेती तंत्र, ॲड. एन. एस. पाटील यांचे कायदा आणि सूव्यवस्था, डॉ. देवेगौंडा यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर अश्या विविध विषयावर प्रबोधन पर उपक्रम पार पडले. दाटे येथे संपन्न झालेल्या पारायण सोहळ्यामध्ये स्वयंसेवकांना कडून प्रसाद वाटप व स्वच्छतेच्या माध्यमातून उत्तम प्रकारचे सेवा कार्य बजावले. या सात दिवसाच्या कालावधीमध्ये शिबीरार्थींनी गाव स्वच्छते बरोबरच प्रबोधनात्मक जनजागृती जल साक्षरता, एड्स जन जागृती, मतदार जनजागृती, व्यसन मुक्ती, प्रदूषण मुक्ती, डिजिटल इंडिया, अंधश्रध्दा निर्मूलन इत्यादी उपक्रम पार पाडून गावच्या विकासात मोलाची भर घातली. त्यामुळे गावकऱ्यांकडून शिबिराथींचे र्कौतुक होत आहे.

     यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योती पाटील, गोकुळ माजी संचालक दीपक दादा पाटील, नगर पंचायतीचे नगराध्यक्ष सुनिल काणेकर,  डॉ. विश्वनाथ पाटील, टी. जे. पाटील, प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल, दाटे गावचे सरपंच किरण नाईक, माजी सरपंच अमोल कांबळे, ग्रा. प. सदस्य संतोष मोरे या सर्वांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भावी वाटचालीस शभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी दाटे ग्रामस्थ राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. 

             कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शाहू गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एन. के पाटील यांनी केले. आभार प्रा. व्ही. के गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment