![]() |
| डॉ. प्रभाकर कांबळे |
रामपूर येथील वनिता फाउंडेशन व मिलिंद सेवा सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच राज्य गुणवंत कामगार असोसिएशन चे मुंबई जिल्हाध्यक्ष विशेष कार्यकारी अधिकारी व गुणवंत कामगार डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळे यांना आयएसओ प्राप्त यूनिवर्सल हार्मनी अवॉर्ड कौन्सिल नवी दिल्ली यांच्या वतीने गेली वीस ते पंचवीस वर्षे महाराष्ट्राच्या जडणघडणीत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मानद डॉक्टर डिलीट पदवीने सन्मानित केल्याबद्दल शिवणगे येथे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार नरसिंगराव भुजंगराव पाटील यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता नरसिंगराव भुजंगराव पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने श्री ताम्रपणी विद्यालय शिवणगे येथे सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच चंदगड तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या २२ मान्यवरांचा व एसएससी एचएससी परीक्षेत चंदगड तालुक्यात मुलांमध्ये व मुलींमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळाराम बाबुराव पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून माणकेश्वर पतसंस्थेचे चेअरमन एस. आर. पाटील तर कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्षपदी प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. एस. पी. बांदिवडेकर आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अशोक नरसिंगराव पाटील, डॉ. पी. आर. पाटील, संजय उर्फ भुजंगराव पाटील, एन. डी. माने, एल. डी. कांबळे, नितीन एन. पाटील व प्राध्यापक एस. एम. पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक, गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी खेडूत शिक्षण मंडळा अंतर्गत असणाऱ्या शिवणगे येथील श्री ताम्रपणी विद्यालयात माध्यमिक शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात राहून तर उच्च माध्यमिक शिक्षण चंदगड येथील न्यू इंग्लिश स्कूल जुनिअर कॉलेज मध्ये घेतले. तसेच पदवी पर्यंतचे शिक्षण घरची शेती करत यशवंतराव चव्हाण कॉलेज हलकर्णी येथे तर एम. ए. व बी एड पर्यंतचे शिक्षण कोल्हापूर येथील रत्नाप्पा कुंभार नाईट कॉलेज व सखाराम बापू खराडे बीड कॉलेज येथे झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्य करून मिळेल ती नोकरी करत जी. डी. सी. अँड ए. व डी सी. एम. ही सहकारातील पदवी प्राप्त केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था विभाग अंतर्गत शासकीय ऑडिटर, निवडणूक निर्णय अधिकारी विशेष कार्यकारी अधिकारी, प्राधिकृत अधिकारी तसेच सामाजिक शैक्षणिक कामगार सहकार व पत्रकारितेच्या माध्यमातून काम करत गेलो. त्या कामाची दखल घेऊन अनेक संस्था, संघटना तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय असे एकूण तीनशेहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

No comments:
Post a Comment