चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व सोन पांढर सुंडी अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०२६ अंतर्गत रविवारी (दि. १ मार्च २०२६) रोजी सकाळी १०.३० वाजता श्री रावळनाथ मंदिर, हेरे येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा विषय “काजू पिक लागवड व काजू बोंड उत्पादन” असा असून परिसरातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. आण्णाजी मारुती गावडे (सामाजिक कार्यकर्ते) हे राहणार आहेत. उद्घाटक म्हणून मा. श्री. इंद्रजीत सावंत-भोसले (सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. प्रा. ऋतुराज सयाजीराव चव्हाण (तज्ञ मार्गदर्शक व एम.एस्सी. उद्यानविद्या सुवर्णपदक विजेते) शेतकऱ्यांना काजू लागवड, उत्पादन वाढ, रोगनियंत्रण व बाजारपेठेतील संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी प्रमुख उपस्थितीत श्री. विशाल बल्लाळ (उपसरपंच, हरे), श्री. सत्यम सावंत-भोसले, श्री. जितेंद्र सावंत-भोसले, श्री. रविकिरण शितोळे, श्री. पंकज तेलंग (माजी उपसरपंच) तसेच डॉ. जी. एम. पाटील उपस्थित राहणार आहेत.
हेरे पंचक्रोशीतील सर्व गावांतील सरपंच, उपसरपंच व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष व सर्व संचालक, सोन पांढर सुंडी अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड तसेच तालुका कृषी विभाग, चंदगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment