संत निरंकारी मिशनच्या वतीने चंदगड नगरपंचायत हद्दीमध्ये स्वच्छता अभियान..! - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2026

संत निरंकारी मिशनच्या वतीने चंदगड नगरपंचायत हद्दीमध्ये स्वच्छता अभियान..!

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    संत निरंकारी मिशनच्या वतीने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मन या अभियानांतर्गत चंदगड नगरपंचायत हद्दीमध्ये सार्वजनिक पाण्याच्या टाक्यांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. 'प्रदूषण अंदर हो या बाहर, दोनो हानिकारक होता है' या वचनानुसार पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण असे अन्य कोणत्याही प्रकारचे बाहेरील प्रदूषण होऊ न देणे ही काळजी सर्वांनी घेणे आवश्यक आहे. तरच आपला निसर्ग स्वच्छ व सुंदर राहणार आहे. आणि याच बरोबर मनातील वैर, विरोध, इर्षा, निंदा, नफरत यासारखे प्रदूषण दूर करून प्रत्येक मानवी मनामध्ये दैवी गुण स्थापित होणे आवश्यक आहे. जेणेकरून समाजामध्ये मानवता टिकून राहील. 

    संत निरंकारी मिशन संपूर्ण जगभरामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान, कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपदामध्ये मदतकार्य यासारख्या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये निरंतर अग्रेसर असते. तसेच प्रत्येक मनुष्यामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, विशालता यासारखे अनेक दैवी गुण अंगी बाणावेत, याच्यासाठी निरंकारी मिशन ही शिकवण जन माणसांमध्ये देण्याचे कार्य करत आहे. 

    या कार्यक्रमाचे उद्घाटन चंदगड नगरपंचायतचे नगराध्यक्ष सुनील काणेकर यांच्या प्रमुख हस्ते संपन्न झाले. तसेच जिल्हा परिषद सदस्या सौ. राजश्री गावडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे, त्याचबरोबर झांबरे गावचे सरपंच विष्णू गावडे, चंदगड नगरपंचायतचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक-नगरसेविका, कामगार वर्ग, सजक नागरिक, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. 

    संत निरंकारी मंडळ ब्रांच नागणवाडीचे मुखी मधुकर शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच नारायण पवार (सेवादल शिक्षक), सौ. नवकांता भोगण (संचालिका), सौ. संगीता चंदगडकर (शिक्षिका) व तालुक्यातून मोठ्या संख्येने साधसंगत व सेवादल बंधू भगिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment